सन्मार्गावर ठेवील. जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उध्दार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उध्दार कर.' आई प्रेरक मंत्र सांगत होती. तारक मंत्र देत होती.
'आई! तू भाऊंची परवानगी मिळव; त्यांची समजूत घाल.' मी सांगितले.
'मी तुला ती मिळवून देईन. निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलले होते.' असे आईने आश्वासन दिले.
रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते. कुळिथांचे पिठले होते. 'म्हटले, श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला.' आई वडिलांना म्हणाली.
'कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एका काळी या हाताने हजारो रूपये मोजले; परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये, असे का मला वाटते? आपल्या होतकरू बुध्दिमान,
कोळिष्टक वगैरे पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदुळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात. त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरावयाचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावयाचे, वाफेवर हे उकडावयाचे, उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो.
वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने नीरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाडया वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी