गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये, असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय?' असे वडील मोठया खेदाने म्हणाले.
'तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण, म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते दहा रूपये त्याला द्यावे, म्हणजे झाले.' आई म्हणाली.
'काही हरकत नाही. स्वत:च्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर, असे काही माझे सांगणे नाही. फक्त, मी शिकवायला असमर्थ आहे, एवढेच. माझा आशीर्वाद आहे.' वडील म्हणाले.
आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. 'आई! मग अण्णा जाणार वाटते? लांब जाणार, लौकर परत नाही येणार?' धाकटा पुरूषोत्तम आईला विचारीत होता.
'हो, बाळ; तो शिकेल व मग तुम्हांला शिकवील. तुम्हांला शिकविता यावे, म्हणून तो लांब जात आहे.' आई त्याची समजूत घालीत होती.
शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले.
वडिलांनी शुभ
एक नारळ फोडला. पातोळयाजवळ बोळू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुध्दि करून घेतात! कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खाववयाचा; मग तो खोवलेला नारळ थोडे कढत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा; नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस. त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस