चेपील? 'श्याम! तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव, रे, माझ्या कपाळावर, कपाळाची जशी लाही होत आहे.' असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन घास जास्त खावे, म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? 'आई! मी थारोळे भरून ठेवतो.' म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागरकळशी कोण भरून आणील? मी घरी गेलो, की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईल, याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण? मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई; तिला सार्यां ची चिंता आहे. देवाला सार्यांनची दया. सार्यांमची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच; एक तोच.

माझी बांधाबांध चालली होती. रात्रीची वेळी बैलगाडी


382 of 468

मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान पाचसहा वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला 'आई जाऊ?'

'कुठे रे बाबुल्या?' मी म्हटले.

'आईला आहे माहीत. जाऊ का?' त्याने विचारले.

आई म्हणाली, 'जा. पण तेथे श्लोकबीक म्हणत नको बसू.' हसत सदानंद निघून गेला. धाकटया भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत, आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू.

मी विचारले, 'आई ! करंदीकरांच्या झोपाळयावर का बसायला गेला?'

आई म्हणाली, 'नाही, रे, त्याला परसाकडे


382 of 773