नऊ वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकटया भावाला म्हटले, 'आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर हो,' बाळ. आईला आता तू!' असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली. ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरविला. ते काही बोलू शकले नाहीत. आणि आईच्या पायांवर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकीवयनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, 'माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा.' 'जा, हो, श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू' त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. 'सांभाळ!' ती म्हणाली. मी मानेने हूं म्हटले. निघालो.
तुमच्यावर किती प्रेम आहे, श्याम! अरे, मी अशी आजारी. मी नाही हो फार दिवस जगायची! आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊबहिणी कोणी पुशीत नाही. गरिबाला कोण? तुम्ही मुलगे-तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख!' असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, 'श्याम ! ते नेहमी म्हणतात, की 'असतील बाळ, तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ.' तुम्ही काळ नका होऊ, जर काळ आला, तर त्याला हाकलून द्या. त्यांना सुख द्या.'
आईचे जेवण झाले. मी