पुन: पुन: मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही. अजूनही धोके आहेत. परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही, तरी तिची कृपा आहेच. आई मेली, तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणांस नेहमी आतून मिळतच असतो.


रात्र चौतिसावी: वित्तहीनाची हेटाळणी


श्यामने सुरूवात केली.

'आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एक दोन मोठी शेते विकली असती, तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते; आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते; परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे.

त्या रात्री आईचे वडील- आमचे आजोबा- आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना


387 of 468

दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. 'आता संक्रांतीस ये, हो. पाय फार दुखत असले, तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे दोन आणे आणि यावे. जप हो.' असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. 'श्याम! मी बोललो, म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग. अभ्यास कर.' ते म्हणाले. नंतर मी दोघां धाकटया भावांस कुरवाळून निघालो. महारवाडयापर्यंत वडील पोचवावयास आले. पुढेही बेहळयापर्यंत आले. आमची गावाची हद्द संपते, तेथे एक मोठे बेहळयाचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो.


387 of 773