होते. किती दिवस झाले, तरी तिच्या डोळयांचे पाणी खळेना परंतु ते दु:ख कमी होत आहे, तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते.

प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे, असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार? पैसे तरी जवळ कोठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली. काही चांगली पुस्तके विकली. पाच रूपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. दोन-तीन महिने शाळा बंद राहील, असा अंदाज होता.

मी हर्णे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरूडपक्षी आले होते. ते मोठयाने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भूपाळया, कोठे वेदपठन ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकटया भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल, अशी भीती वाटत होती.


399 of 468

ढोंगी-कोणाला, गं, म्हणतेस ढोंगी! असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे! फारच शेफारलीस तू.' आजी भांडू लागली.

"मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी, म्हणून? मी तयारी केली, जाते धुऊन ठेवले. परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच! दुसर्याणला तोंडघशी पाडता येते तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का?' आई म्हणाली.

"मी का हात लावीत नाही? शर्थ आहे बाई, तुझ्या बोलण्याची! नाही जात खर्यांफकडे, हो. तुझ्या डोळयांत खुपत असेल,


399 of 773