अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरूषोत्तमाजवळ गोष्टी बोलत मी अंथरूणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरूणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेविले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरूषोत्तम झोपला व मलाही झोप लागली.
परंतु एकदम दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावरून पडलो, असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो, तेव्हा पुढील संवाद माझ्या कानांवर पडला.
आई गोवार्याद निशीत होती. दुसर्याव दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवार्याो निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती.
'त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल, म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली. अजून का शाळा उघडली नसेल?' असे वडील म्हणाले.
'तो खोटे का बोलेल?' त्याला तिकडे हाल काढावे लागतात; तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही.' असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती.
"जगून काय करायचे, असले अभद्र काय ग बोलतेस? तुझी पोरेबाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग. मुलाबाळांची लग्ने होऊ देत. सुना घरात येऊ देत, वेडेविद्रे नको बाई मनात आणू! अग, तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते.' आजी म्हणाली.
"तुम्ही जा खर्यां कडे. येत्ये म्हणून कळविले आहेत तुम्ही, तर जा. भाजणी उद्या होईल. तसेच जाते धुतलेले ठेविले, म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही, की झाले. तुम्हांला आज चहा देत्ये