पाहिली! आईला मी त्या वेळेस कायमची सोडीत आहे, तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे, अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरूध्द देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवावयाचे होते. दुसरे काय!
रात्र छत्तिसावी: तेल आहे, तर मीठ नाही!
"आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस?' भिकाने विचारले.
'आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले.' गोविंदा म्हणाला.
इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले. 'अलीकडे श्यामचे मन दु:खी आहे. ते त्याचे दु:खी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे.' राम म्हणाला.
'सर्व सिध्दीचे कारण । मन करा रे प्रसन्न ॥'
असा तुकारामाचा चरण आहे.
'श्याम कोठे गेला आहे, गोविंदा?' रामने विचारले.
'ते मघा तर वरती होते.' भिका म्हणाला.
वाटत नसे. परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे. रोज फाटका भाग निर्यांरमध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत.
मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता. परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्या बरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे तीन रूपये पाठविले होते. आमच्यासाठीही खाऊ पाठविला होता.