'ते त्या ऐलाबाईकडे जाणार होते, तरी बरीच आजारी आहे म्हणतात.' गोविंदा म्हणाला.
'काय एकेक नाव? ऐलाबाई हे काय रे नाव? भिकाने विचारले. 'अरे, ऐलाबाई, म्हणजे अहिल्याबाई. अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो. तो म्हणाला.
यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला.
'काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले.
'काही नाही. ती ऐलाबाई कशी आहे?' त्याने विचारले.
'तिला गावाला पाठविली त्यांनी.' श्याम म्हणाला.
'बरी होईल का? पोरेबाळे लहान आहेत.' भिका म्हणाला.
'कोणाला माहीत? आपण तरी काय करणार? श्याम म्हणाला.
'भिका! आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते.' भांडयाकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला.
'जसे कापूस पिंजता तुमचे नव्हते.' भिका म्हणाला.
'का? आजचे पेळू चांगले नाही का झाले?' श्यामने विचारले.
त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे.' गोविंदा म्हणाला.
'माझे तर सूत तुटत नव्हते.' श्याम म्हणाला.
ते तीन रूपये पाहून आईला आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रूपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. 'मामाने खाऊ पाठविला. आम्हांला दे.' आम्ही तिच्या पाठीस लागलो. जरदाळू व पेपरमिंटच्या वडया होत्या. आईने एकेक जरदाळू व दोन दोन वडया दिल्या. माझा धाकटा भाऊ 'दोन जरदाळू पाहिजेत' म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, 'अरे, तो तुमच्यासाठीच आहे. आज का एकदम संपवावयाचा आहे? पुरवून खाल्लात, तर तुम्हांलाच बरेच दिवस पुरेल.' तो म्हणाला, 'तर