'तुमचे पेळू पहिले असतील.' भिका म्हणाला.
'नाही, रे; आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविलेले पेळू मी माझ्या पुडीत ठेवले होते.'
'मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल, म्हणून बदलले होते.' गोविंदा म्हणाला.
'श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही.' राम म्हणाला.
'झोप येत नाही, तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो.' श्याम म्हणाला.
'झोप न यायला काय झाले? आम्हांला बरी झोप येते?' राम म्हणाला.
'तुम्ही खूप काम करता. झोप लागावयास दिवसा तप करावे लागते. शरीर झिजवावे लागते.' श्याम म्हणाला.
'तू नाही वाटते काम करीत? सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास.' राम म्हणाला.
'परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये, असे तुम्हांला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ?' श्यामने विचारले.
मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची दे.' आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंध्याचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो.
आईने खाऊ फडताळात, मुंग्या न येतील, अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोडया वेळाने तिने मला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, 'श्याम, अमृतशेटजींकडे जाऊन नवीन धोतरजोडयास काय पडते विचारून ये. त्यांच्यासाठी हवा आहे, म्हणून सांग. घरात आहेत का, म्हणून त्याने विचारले, तर