पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत.
गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते.
"चलता ना आश्रमात, प्रार्थनेची वेळ होईल.'
श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला 'गोविंदा! बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी, दगड-धोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन:
'यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे । हालविना तरूवर पुष्प फळ पान रे ।
गोपीनाथा आल्ये आल्ये सारूनीया काम रे । वृंदावनी वाजविशी वेणू, जरा थांब रे'
"गोविंदा! लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळयात
होते. पोत, पेटया, सरीवाकी, गोटतोडे, सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो.
"मित्रांनो ! माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा-अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी