'तुला बरे वाटत नव्हते, म्हणून काम करू दिले नाही. त्यांनी,' राम म्हणाला.
'लोक यायला लागले. घंटा दिली पाहिजे.' गोविंदा म्हणाला.
घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थने नंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरूवात केली.
आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात सार्यानचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही. मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावावयास ढलपी नसे, थारळयात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यांवरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणीसुध्दा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे. काय करील बिचारी! अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या-मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर
गावाला गेले आहेत, उद्या येतील, असे सांग. चौकशी करून येण्याला मला सांगितले, म्हणून आलो, असे सांग, जा.'
मी अमृतशेटजींच्या दुकानात गेलो. मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते. मोहन्या मला म्हणाला, 'काय, रे, श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील, म्हणून आलास होय ना?'
मी त्याला म्हटले, 'चित्रे देत नाहीस, मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही. परंतु धोतराचा भाव विचारावयास मी आलो आहे.'
'कोणाला धोतरजोडा? तुला?' त्याने विचारले.
'नाही, भाऊंसाठी. चांगला लांब-रुंद