घालून त्याच्या कोमल, लुबलुबीत टाळूवर तेल घालून 'तो तो तो! बाळाची बायको यो यो यो!' असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई न्हाऊमाखू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले; ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडाथोडा तजेला येऊ लागला.
राधाताईंची आईवर श्रध्दा बसली. महिना होताच त्यांनी दोन रूपये आईच्या हातावर ठेवले. 'दोन कशाला? एक पुरे, हो!' आई म्हणाली.
'घ्या, हो, यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावयाची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवावयाचा नसतो.
आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. 'देवा! माझी लाज सारी तुला! असे ती म्हणाली. दोन रूपयांतून तिने थोडे तेल, थोडे तूप आणविले, एक नारळ आणविला. थोडया करंज्या व चार अनरसे तिने केले. दिवाळीच्या चार दिवसांत बाहेर दोन दिवल्या लाविल्या. भाऊबीजेच्या
होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो, तरी तृप्त होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. पावसाळयात सर्वत्र घाण होते. विष्ठा, शेण सारे आजूबाजूला पडलेले असते. ही घाण दूर करावयाची, म्हणजे नरकासुराला मारणे होय आणि मोठी गंमत आहे. सत्यभामेने नरकासुराला मारले. ती कृष्णाला म्हणाली, 'तुमच्याने हा मरणार नाही, याला मीच मारीन.' घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंडा आहे. पुरूष घरात घाण करतात; परंतु बायका स्वच्छता ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरूषांच्या हातांत घर असते.