दिवशी पुरूषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळिले. चार आणे पुरूषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरूषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटुकनळीत घालून पुरूषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली, तर पारिग्याचा पाला घालून वाजवी. निराळया फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही.
परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली-गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येई, थोडा दमही लागे. तरी गाडे ढकलता येत होते तो पर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरूषोत्तमाने घोरिवडयातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले, तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदीकुंकू वाहताना आई म्हणाली, 'तुळसादेवी! माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा.'
रात्र सदतिसावी: अब्रूचे धिंडवडे
श्यामने आरंभ केला.
शेवटी आमच्यावर मारवाडयाने फिर्याद
ते धड केर काढणार नाहीत, चूल सारवणार नाहीत, शेण नीट लावणार नाहीत, भांडी घासणार नाहीत, दिवे पुसणार नाहीत! चार दिवसांत घर म्हणजे उकिरडा अशी स्थिती करून टाकतात. परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात. नरकासुर सत्यभामाच मारील. घाण स्त्रियाच दूर करतील. परंतु अलिकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात! राक्षस रस्त्यात ठेवला, तरी तो वाईटच. घाण रस्त्यात फेकू नये. म्युनिसिपालिटीच्या पेटया असतील, त्यांत जवळ जाऊन घाण टाकावी.
आम्ही सारे स्वच्छ करीत होतो.