वाजवी. दुसर्याूच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते.

महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत.

'पुर्षाच्या घराची जप्ती होणार, ढुमढुमढुम!' असे ती म्हणत व पुरूषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळयांतून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला,

'मी घरी जाऊ का?'

मास्तर म्हणाले, 'कोठे चाललास? बस खाली! अर्ध्या तासाने शाळाच सुटेल.' मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवाकालव समजली का नाही?

दहा वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या 'ढुमढुमढुम' करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला.


417 of 468

आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली. आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीस गेले.

आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळातून सुध्दा जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवांनासुध्दा कढत पाण्याची आंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे! परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवांची पूजा केली. करंजी-अनारशांचा नैवेद्य होता. पहाट


417 of 773