ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप! आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जातात आई धाडकन् खाली पडली. 'आई आई!' असे करीत पुरूषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरूणावर ठेवण्यात आले. थोडया वेळाने आईला शुध्द आली व म्हणाली, 'ज्याला भीत होत्ये, ते शेवटी झाले! आता जगणे व मरणे सारखेच आहे
रात्र अडतिसावी: आईचा शेवटचा आजार
श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता.
"श्याम! पाय चेपू का?' गोविंदाने विचारले.
'नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लौकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार! राम राम म्हणत मी शांत पडून राहीन.' श्याम म्हणाला.
'श्याम! कोणी आजारी पडले,
वसूल होईल, हीच मला काळजी आहे. तुम्हांला उधार देऊन फसलो,' असे तो मला म्हणाला. तू घेऊन आलीस वाटते? का मोहन्याला बोलावून त्याला गळ घातलीस?' वडील चौकशी करू लागले.
'मी ते विकत आणले आहे. श्यामने जाऊन आणले.' आई म्हणाली.
'श्यामजवळ कोठले पैसे?' त्यांनी विचारले.
'मी दिले.' आई म्हणाली.
'तुझ्याजवळ कोठले?' त्यांनी विचारले.
'पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळया कृष्णाबरोबर पाठविले.' आईने सांगितले.
'केव्हा आला काळा कृष्णा?' त्यांनी विचारले.
'झाले दोन दिवस.' आई म्हणाली.