पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा, घेऊन ये; नाहीतर इंदूलाच मी बोलावत्ये, म्हणून सांग, तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण.'

पुरूषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली.

'यशोदाबाई! जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा?' ती प्रेमळ मुलगी म्हणाली.

'नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलाविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सखूला, तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलाविले आहे, म्हणून लिही. कसे लिहावे, ते तुलाच चांगले समजेल.' आई म्हणाली.

इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरूषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली.

'बाळ, पाणी दे रे!' आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला.


426 of 468



मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसर्याख दिवशी आंबोळया करावयाच्या होत्या. मला आंबोळया फार आवडत असत. मायलेकरे अंगणात दळत होती व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व ओव्यात 'श्याम बाळ' असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता.

दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते. कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो.

आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीवयनी आल्या.


426 of 773