'चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर.' असे आईने सांगितले. तसे पुरूषोत्तमाने पाणी पाजले.

'या जानकीबाई, या हो, बसा.' जानकीबाई समाचाराला आल्या होत्या.

'पाय चेपू का जरा?' त्यांनी विचारले.

'चेपू बिपू नका. ही हाडे, जानकीबाई, चेपल्याने खरेच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले.' आई म्हणाली.

'आवळयाची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल.' जानकीबाईंनी विचारले.

'द्या तुकडा आणून.' क्षीण स्वरात आई म्हणाली.

'चल पुरूषोत्तम, तुजजवळ देत्ये तुकडा, तो आईला आणून दे.' असे म्हणून जानकीवयनी निघून गेल्या. पुरूषोत्तमही

त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळयाची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरूषोत्तम जवळ बसला होता.

'जा हो बाळ, जरा बाहेर खेळबीळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल, त्या दिवशी आता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे?' असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली.


427 of 468



'बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, 'आज रात्री एकटया कशा दळीत बसल्यात, म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय? तू इंग्रजी ना शिकतोस?' जानकीवयनी मला म्हणाल्या.

मी आईला विचारले, 'आई ! दळायला हात लावला, म्हणून काय झाले?'

आई म्हणाली, 'श्याम ! अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे, म्हणून पाहावयाला आल्या. अरे, काम करणाराला का कोणी नावे ठेवतील? आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणार्याेला हसेल, तो


427 of 773