पुरूषोत्तम बाहेर खेळावयास गेला.

तिसरे प्रहरी नमूमावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण. ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी-बोरखडयाने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळयावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजिली होती. एकमेकींकडे वसोळया म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिलासुध्दा मधूनमधून बरे नसे.

'ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आई?' आईने नमूला विचारले.

'बरे आहे. चाफ्याच्या पानांनी शेकविले. सूज ओसरली आहे. पण, तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस. ताप निघत नाही अंगातला?' नमूमावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली.

'नमू, तुझ्याबरोबर पुरूषोत्तम येईल, त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारकाकाकू ओरडते. तुला सारे समजते.


428 of 468

रानटीच समजला पाहिजे. तुझ्या भक्तिविजयात जनाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत?'

'हो, खरेच आहे! पण खरे असेल का ग ते? देव कबिराचे शेले विणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुणी धुऊ लागे; नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी, नाचे खरे का, ग, हे सारे?' असे मी विचारले.

'बसा ना, जानकीबाई, अशा उभ्या का?' असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली, 'श्याम, अरे, खरेच असेल ते. देवावर ज्यांची श्रध्दा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम


428 of 773