व्यर्थ का जातो?' गोविंदा म्हणाला.
बोलत बोलत दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातील काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली.
स्थिरावला समाधीत ! स्थितप्रज्ञ कसा असे.
वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे.
प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टीस सुरूवात केली.
'माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडांत आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया व क्षमा, कष्ट व सोशिकता, यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासुरवास झाला; परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही. तिने स्वत:च्या मुलास एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते.
माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे
फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो. पिकांचा अंदाज करतो. 'याला पीक धरणे' असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले, तरी चांगले लावतात! लोकांनी वसूल दिला नाही, तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसार्यालचे हप्ते- वसूल आला नसला, तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत!'
"आमच्या वर्हा!ड - नागपुराकडे मालगुजार असतात, तसाच प्रकार दिसतो.' भिका म्हणाला.
गोविंदा उत्कंठेने म्हणाला, 'पुरे रे आता तुमचे ! तुम्ही पुढे