काय? शिकवणी वगैरे करतो. परवा पाच रूपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल.' आई सांगत होती.

'श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे?' नमूने विचारले. 'त्याला कळवू नका, असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ? येथे आला, म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय का ही लांबची येणीजाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे; परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेवो, म्हणजे झाले. माझे काय?' आई म्हणाली.

नमुमावशी निघाली. 'कुंकू लाव, ग. तेथे कोनाडयात करंडा आहे.' आईने सांगितले. नमूमावशीने स्वत:च्या कपाळी कुंकू लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली.

'आई! हे बघ मावशीचे पत्र. मला सारे लागले. वाचू मी?' असे म्हणून पुरूषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले.


430 of 468



मी म्हटले, 'मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावे असे वाटते. आई! ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो, तर मला भेटेल का देव?'

आई म्हणाली, 'बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्याई केवढी थोर! त्याचा निश्चय किती अभंग! बाप राज्य द्यावयास लागला, तरी तो माघारी फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कोठून आणावयाचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर. मग केव्हा तरी देव भेटेल!'

जानकीबाई म्हणाल्या, 'श्याम! सोड, मी लावते आता हात. दमला असशील तू.' मी आईला म्हटले,


430 of 773