मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली.

'इंदू ! उद्या येणार हो सखू. तू पत्र लिहिले होतेस ना! हे बघ तिचे पत्र. दे रे इंदूताईला.' आई पुरूषोत्तमास म्हणाली.

इंदूताईने पत्र वाचले व म्हणाली, 'मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे, की केव्हा त्यांना बघेन.' इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. 'पुरूषोत्तम! चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल.' इंदू म्हणाली.

'जा बाळ, त्या परक्या नाहीत, हो.' असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला.

'माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला-प्यायलाही मला देत येत नाही. मी अभागी आहे. काय करू मी तरी?' वडील आईजवळ बसून म्हणत होते.

'हे काय असे? तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागलेत. तर धाकटया पुरूषोत्तमाने काय करावे? पुरूषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊन


431 of 468

'आई, तूच जरा हात सोड. जानकीवयनी व मी दळतो. जानकीवयनी, मला वैरण घालता येते. डोळे मिटूनसुध्दा घालता येते. मी आता तरबेज झालो आहे. आई, सोड ना हात थोडा वेळ.'

मी आईचा हात सोडविला व जानकीवयनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. 'जानकीवयनी! पाहा, कसे पीठ येत आहे, ते? डोळयात घातले, तरी खुपायचे नाही. पाहा ना.' मी त्यांना म्हणालो.

जानकीवयनी आईला म्हणाल्या, 'बाई, श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत!'

आई म्हणाली, 'माझ्या घरात कोण आहे


431 of 773