मावशी पहाटे येणार होती. पुरूषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाडयांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणार्याक बैलगाडया पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली, असे वाटताच पुरूषोत्तम धावत जाई व पाही. परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेडयाशी थांबली.

'आपल्याच बेडयाशी थांबली रे!' आजी म्हणाली. दुर्वांची आजी पोतेरे घालीत होती. पुरूषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय मावशीच आली होती. पुरूषोत्तम करंडी घेऊन आला; वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला.

'आई, मावशी आली ना! ही बघ, खरेच आली.' आईला हलवून पुरूषोत्तम म्हणाला, पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते.

'आली? माझी वाट मोकळी झाली !' असे आई म्हणाली. अर्धवट शुध्द, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी


434 of 468

येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो, लग्न करून हेच साधावयाचे. लग्न करून पुरूष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो. स्त्री बुध्दीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुध्दी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरूषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरूषगुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारीनटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वत: पुरूष अपूर्ण आहे. स्वत: एकटी स्त्री अपूर्ण आहे. परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे


434 of 773