कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते! तिला मंगळ होता. त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंडयाची अडचण होतीच. आमचे नाव होते मोठे. बडे घर पोकळ वासा, अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचविली, कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाच तो! या हुंडयाच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. 'मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे, कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत!' असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरूणच नादान!
या हुंडयाची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वत:ला जाळून घेतले. त्या वेळेस क्षणभर तरूणांनी हुल्लड केली. सभा भरविल्या, ठराव केले; परंतु पुन्हा
सांगा.'
श्यामने पुन्हा गोष्टीला सुरूवात केली.
"आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धो धो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते. निरनिराळया जातीची फणसाची झाडे होती. कापे, बरके, अर्धकापे; तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हांस मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत; परंतु गडयांनो! ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते! पाप