पाणी घाला' म्हणे; तर क्षणात 'ती पहा दवंडी देताहेत, मला कानांत बोटे घालू दे.' असे म्हणे. पुरूषोत्तम फक्त निजला होता. बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. सार्यांेची तोंडे उतरून गेली होती; म्लान झाली होती. जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता!


'तो पाहा, त्या खुंटीवर श्याम बसला आहे. खाली ये रे गुलामा. लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला- ये, मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचा, तर कुणाजवळ- पण आता पुरे. ये, मला भेट!' आईचे वातात बोलणे चालले होते.

'अक्का ! अक्का!' मावशी आईला हाक मारीत होती; शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती.


'नमू! तुझे तेल परत नाही केले. रागावू नको हो. श्याम ! ये रे तुझे थंड हात ठेव कपाळावर!' आईचे शब्द ऐकून सार्यां चे डोळे भरून आले होते. कोणी बोलेना. सारे स्तब्ध.


'तुमची मांडी हीच माझी अब्रू; दवंडी देतात. द्या म्हणावं- तुमचे पाय आहेत


443 of 468



आई म्हणाली, 'मी १०८ फुले वाहणार आहे. फुलासारखे निर्मळ व शुध्द दुसरे काय आहे? फुले वाहीन, हो मी.'

आई म्हणाली, 'श्याम! जे वाहावयाचे, ते देवासाठी असते. ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायांवर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले, तो थोर प्रसाद आहे, असे त्याला वाटले, तर घेईल. नाही तर देवाच्या पायावर फूल राहील. आपणांस दुसरे काही देता येत नाही, तर काय करावयाचे? देता येईल, ते देवाला द्यावे.'

'मग कोणती १०८ फुले वाहणार आहेस? आपणांकडे फुले तरी चांगली कोठे


443 of 773