आलास, तर मग ये- असा रूसू नको, श्याम! मी दळायला लाविले म्हणून रूसलास? आता नाही हो दळायला लावणार. आता संपले. ये श्याम! नाही काय म्हणता! तो पाहा, मला दिसतो आहे समोर- श्यामच तो- तुम्हाला ओळखता नाही आला, म्हणून आईला का नाही ओळखता येणार?'


अशी वातात रात्र गेली. दिवस उजाडला. पुरूषोत्तमला मावशी म्हणाली, 'राधाताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव जा.' हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात. दोन मिनिटे आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना. एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते!

त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. वडिलांना उपवास असे. परंतु ते अशक्य झाल्यापासून दुपारी धान्यफराळ करीत. सोजी खात. आई त्यांना म्हणाली, 'आज चतुर्थी ना? जा, स्नान करा. थोडी सोजी खाऊन घ्या. असे हाल नका करू हो स्वत:चे जा. खाऊन घ्या.' तुटक- तुटक मोठया कष्टाने बोलत होती.


445 of 468

फुलावयाची. परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे, तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही. म्हणून ऋषींनी, संतांनी देवाला पानच प्रिय आहे, असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्तीने वाहावयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहावयासही लाज वाटू नये. दुसर्यां नी देवाला वाहिलेले रूपये, खण नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये, म्हणून देवाला पान प्रिय आहे, असे संतांनी ठरविले.

श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व गरिबाला


445 of 773