वडील उठले. स्नान करून देवळात गेले. येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले.
आईने धाकटया पुरूषोत्तमला जवळ घेतले. त्याच्या तोंडावरून हात फिरविला. अत्यंत क्षीण स्वराने ती म्हणाली, 'बाळ चांगला राहा. हट्ट नको करू. दादा, अण्णा आहेत तुला. मावशी आहे. चांगला नीट वाग!' पुरूषोत्तम रडू लागला. आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवीत होती.
'सखू! सार्यां नी खाल्लेत का?' आईने विचारले.
'होय हो अक्का.' मावशी म्हणाली.
'सखू! सारी तुझी हो. माय मरो, मावशी जगो. पुरूषोत्तम, श्याम, सारी तुझी. चंद्री, गजू सारी तुझी.' आई शेवटची निरवानिरव करीत होती.
'होय हो अक्का.' मावशी म्हणाली. 'श्याम गरीब. गुणाचा, चंद्री, गजू देव आहे सार्यां ना तो!' आई तुटक बोले. किती तरी वेळाने एकेक शब्द बोले.
सारी आईच्या भोवती बसली होती. दूर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली, 'क्षमा- बोलल्ये चालल्ये विसरा!' आजी विरघळून गेली. किती तरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी.
गरिबीची लाजही वाटावयास नको, असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली, तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. हेतू हा, की श्रीमंताला आपण फार दिले, असे वाटू नये. आपण एक पान दिले, असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी, सुंदर पाने आधी हवीत. १०८ तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहाणार आहे.'
'मग या वेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस!' मी अधीर होऊन म्हटले.
आई म्हणाली,