'सखू! नानांना म्हणावं, क्षमा करा. त्यांची मी मुलगीच आहे. बयोला, म्हणावे, क्षमा करा.'


पुन्हा शांत. मध्येच आई डोळे गरगर फिरवी; मध्येच डोळे मिटी.


'श्याम!' एकच शब्द.


'अक्का! त्याला आज बोलावत्ये, हो.' मावशी म्हणाली. मावशी भाऊंना म्हणाली, 'भटजींना बोलवा व गोप्रदाने सोडवा.'


मरताना गाय दान द्यावी, असे आहे. गाय नसेल, तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात. आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात

आली.


आईला बोलता येईना, वाणी गेली. ती नुसती पाही. पुरूषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी. मध्येच बोट वर करी. देवाकडे


जात्ये, असे सुचवी. बर्याीच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली, 'तुम्ही जपा, हाल करू नका. मी सुखाने या मांडीवर...' जास्त बोलवेना.


सारे शांत होते. आईला ऊर्ध्व लागला. गावातील वैद्य कशाआप्पा आले. त्यांनी नाडी पाहिली. 'अर्धी घटका' ते खिन्नपणे म्हणाले व


447 of 468

'मी परवा रात्री त्यांना सांगितले, की सोमवतीला चांगलीशी फुले घालावयाचे ठरविले आहे. झेंडू, पांढर्याा चाफ्याची फुले ही आहेतच. परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून, तर आणावी.'

मी एकदम म्हटले, 'म्हणून भाऊ गावाला गेले आहेत, होय.'

'होय, ते जालगावला गेले आहेत. तेथे बर्व्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाड आहेत. ती १०८ फुले मिळाली तर पाहावी, म्हणून ते लांब गेले आहेत. 'आपल्याजवळ पैसे नाहीत; परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत' असे ते म्हणाले,' आई म्हणाली.


447 of 773