गेले. शेजारच्या जानकीवयनी व राधाताई आल्या होत्या. नमूमावशी बसली होती. इंदू होती.
तेथे स्मशानशांती होती. आई जाणार, कोणाला शंका नव्हती.
'तिला श्याम व चंद्री भेटली नाहीत; गजू भेटून गेला.' वडील म्हणाले.
आईचे ओठ हलले, असे वाटले. काही बोलावयाचे का होते? काही सांगावयाचे का होते? परंतु बोलवत नव्हते. ते ओठ राम म्हणत होते की श्याम म्हणत होते? राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली. खाली जाणार्याम जिभेला त्यांनी चटका दिला.
'सारी जपा!' आई म्हणाली.
'काही सांगावयाचे आहे का?' राधाताईंनी मोठयाने कानात विचारले. आईने 'नाही!' अशी खूण केली.
घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता. शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता. पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले 'सारे सांभाळा. देव आहे!'
शेवटची लक्षणे दिसू लागली. जीभ आत ओढली जाऊ लागली. वेळ आली. देवाघरी जाण्याची वेळ आली; मंगल
मित्रांनो! चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा व नागचाफा, पांढर्याे चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार असतो; परंतु नागचाफ्याचा गोड असतो. चार बाजूंना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळया व मध्ये पिवळा परागपंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते हे फुल.
गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचारणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही, ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, खाली मान घालावयास