वेळ आली. राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले; तुळशीपत्र तोंडात ठेवण्यात आले. आईला घोंगडीवर घेण्यात आले. देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते.
थोडा वेळ गेला. 'राम' ऐकू आले आईने राम म्हटला! सार्यांतना अथांग सागरात लोटून आई गेली. बोलावणे आले; ती गेली. ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही. श्यामची आई निघून गेली. भाऊंची पुण्याई गेली; पुरूषोत्तमवरचे कृपाछत्र गेले. श्याम व गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तिदात्री देवता, प्रेममय देवता गेली! चंद्रीचे माहेर गेले! नाना, आजी यांची आवडी गेली!
गडीमाणसे यांची बयो गेली; जगातील जंजाळातून सुटून आई मोठयांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली!
रात्र एकेचाळिसावी: भस्ममय मूर्ती
आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली
लागणारी ती नव्हती. त्याच्या जवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा, असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकविणारी, देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती.
रात्र पंचविसावी: देवाला सारी प्रिय
संध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेला होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. 'आई! मी जाऊ का बाहेर? कमळया देवधराकडे, नाही तर बन्या वरवडेकराकडे