सारे थंड! हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, आंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घडयाळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे, दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म; परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलांमुलींसही विकतात यापरता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात; पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदये ज्यांची असावीत ते तरूणही मेलेलेच! निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणार्या रुढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे, हे मी कसे म्हणू? असे जगाने कसे म्हणावे? परंतु जाऊ दे. मी भावनाभरात कोठे तरी वहात चाललो.'


"तुम्ही भलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मधच मिळणार ! आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार; तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा


45 of 468

क्षणभर हसते व कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते; परंतु कायमचे धुळीत मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या तार्या प्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात.


"खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे. बोलावले तर गेले पाहिजे; नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा. गावातील कष्टाळू बायकामाणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या; कणगरे, करिंदे, रताळी लावावी; भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची. खरोखर या जगात दुसर्याचच्या


45 of 773