मीही पडावात उतरलो. बंदरावरून कोणी तरी माझ्याकडे पाहात होते. माझे तिकडे लक्ष नव्हते. त्या व्यक्तीचे माझ्याकडे लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कोणाची ती मूर्ती होती?
पडाव उभा राहिला. मी पटकन् उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झपझप पावले टाकीत होतो. इतक्यात माझ्या कोण दृष्टीस पडले? मावशी ! माझ्या दृष्टीस माझी मावशी पडली.
'मावशी! तू इकडे कोठे? परत जातेस होय पुण्याला? आईचे बरे आहे वाटते?' असे मी विचारले. मावशीच्या गंगा-यमुनांनी उत्तर दिले.
'मावशी! बोलत का नाहीस?' मी काकुळतीने विचारले.
'श्याम! तुझी आई, माझी अक्का, देवाजवळ गेली!' ती म्हणाली.
माझा शोकसागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हते.
'मला बोलावलेत ग का नाही? मला स्वप्न पडले, म्हणून निघालो. स्वप्नात आई मला हाक मारी. परंतु आता कोठची आई?
कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला.'
'ए गोयलेवाली! अग, इकडे ये.' मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, 'म्हाता-ये, आजारी का गं आहेस?'
'व्हय, माय. ताप लई येतो. काय करातांव, पोटाला हवं ना!' असे ती म्हणाली.
'दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे. देऊ का तुला?' आईने विचारले.