'मावशी! तू परत निघालीस? मी विचारले.


'होय. तेथे माझ्याने राहवेना. तू घरी जा. उद्या तिसरा दिवस. अस्थिसिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका; म्हणून उत्तरक्रियेला आलास. येताना अस्थी घेऊन ये. गंगेत नेऊन टाकू.' मावशी म्हणाली. 'मावशी! मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ? मी म्हटले.


'त्या अंधारात आईचा मुखचंद्र नसला, तरी वडिलांचा तारा आहे. तुझ्या भावाचा तारा आहे. तेथे सारा अंधार नाही. तेथे प्रेम आहे. जा घरी, त्यांना धीर दे. तू शहाणा, विचार करणारा, गीतांजली, गीता वाचणारा' मावशी म्हणाली.


'श्याम! आलास का, थांब, हो, देवाला गूळ ठेवते, असे आता मावशी कोण म्हणेल?' मी म्हणालो.


'श्याम ! या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली. तरी प्रेमरूप आई-स्मृतिरूप आई- तुझ्याजवळ आहे. जेथे जाशील, तेथे आहे. चल तुझ्यासाठी गाडी ठरवू.' असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी


456 of 468

मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, 'आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही, एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो. पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता; भास्करभटजींना इतका आग्रह झाला, की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपटयांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळयाचे पाणी वाढीत होते;


456 of 773