ठरविली. मावशीची बोट दूर दिसू लागली. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली.
मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवनसमुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटांतून वर येत आहे, असे मला दिसे. आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले. कारूण्यमूर्ती! माता! तिचे प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली.
शेवटी मी एकदाचा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्या वेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात गाणे कोठले? तेथे हाय हाय होती! घरात एक मिणमिण दिवा जवळ होता. भेसूर शांतता होती. मी दार लोटले. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडले. वडील एका तरटावर बसलेले होते.
'श्याम! दोन दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून, बाळ!' ते म्हणाले.
पुरूषोत्तम जागा झाला. 'अण्णा, अण्णा,'
परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, 'घास घाला हो, दादा.' आई? तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे, तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत- ते मुंबईला नोकरीस असतात व पीतांबर नेसलेले होते. ते वाढीव होते- ते एकदम मांडवाबाहेर गेले व म्हारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, 'लाज नाही वाटत भीक मागायला या वेळी! अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात, तर तेथे ओरडत बसली! तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी!