असे म्हणून तो रडू लागला. मला त्याने मिठी मारली. आम्हांला कोणासही बोलवत नव्हते.


दूर्वांची आजी म्हणाली, 'तुझीच आठवण काढीत होती हो श्याम! तिचा लाडका तू. शेवटी तिच्या उत्तरक्रियेला तरी आलास. रडू नको. आता उपाय का आहे? तुम्ही मोठे होईतो हवी होती हो जगायला. परंतु नाही त्याची इच्छा.' मी ऐकत होतो.


अस्थिसंचयनासाठी मी नदीवर गेलो. भटजी बरोबर होते. नदीकाठी जेथे आईचा पुण्यदेह अग्निसात् करण्यात आला होता, तेथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती. जशाच्या तसा भस्ममय देह होता. वार्यातने इवली देखेल मूर्ती भंगली नव्हती. त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केले. सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता. अत्यंत शुध्द असा भस्ममय आकार तेथे होता. जीवनातील तपश्चर्येने आधीच देह भस्मीभूत झाला होता. आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरील भस्माइतकाच पवित्र झाला होता. मनाने तर ती पवित्र होतीच होती.


458 of 468

नीघ, का मारू वहाण फेकून?' असे म्हणून आई, त्या पीतांबरधारी मनुष्याने खरेच वहाण उचलली. 'नको, रे दादा. नको रे मारू. जात्ये, रे दादा.' असे म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात. दुसर्या चे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास! मघाची ती म्हारीण नाही का म्हणाली, 'गरिबाला कोणी नाही,' तेच खरे. आई! उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला, तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पानसुपारी, अत्तर, गुलाब करतील;


458 of 773