लावला, मी हात लावला. भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली. या नश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपणास अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढे भाग्य? मी आईच्या अस्थी गोळा केल्या. मंगळसूत्रातील मणी सापडले, ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले, स्वत:च्या पत्नीच्या गळयात घालण्यासाठी नेले.


सर्व विधी करून आम्ही घरी गेलो. एकेक दिवस जात होता. पुरूषोत्तमाच्या तोंडून एकेक कहाणी ऐकत दिवस जात होता. आईच्या आठवणीचे पवित्र गुरूपुराण पुरूषोत्तम मजजवळ वाचीत असे व मी ऐकत असे. शेजारच्या इंदू, राधाताई यांनीसुध्दा आठवणी सांगितल्या. आईचे कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके येत.


आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही


459 of 468

त्याच्या गळयात हार घालतील आई! पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का, ग, ह्यांचा देव? हातात वहाण घेऊन त्याचा पीतांबर बाटला नाही. पायांत पायतणे घालून ही सोवळी, हे मुकटे, कद हातात घेऊन खुशाल जातात; परंतु ही वहाण ज्याने ह्यांना पायांत घालावयास दिली, तो मात्र घाणेरडा! त्याची सावलीही नको! आई ! हे कसे, ग? हे कसले सोवळे! हा का धर्म? देवाला हे आवडेल का, ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही?

आई म्हणाली, 'बाळ! जगात सारे पैशाला, सत्तेला


459 of 773