अंतरात्मा डोलू लागतो.' नामदेव म्हणाला.
"तुमचे काहीही असो ते गोड लागते. तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटकमंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती? हॅम्लेटचे नाटक जाहीर केलेले असावे; परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत! प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारेच छान. तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या. आम्हाला आनंदच आहे.' गोविंदा म्हणाला.
"मग अक्काच्या लग्नाचे काय झाले?' रामने विचारले.
श्याम म्हणाला, 'रामची आपली मुद्दयाशी गाठ. बरे तर ऐका, पुष्कळसे हिंडल्याफिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते. मी तेव्हा सहा-सात वर्षांचा असेन. मला फारसे आठवत नाही; परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाडया, ते सारे आठवत आहे. गावातील
श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसर्यातला राबवून, रात्रंदिवस श्रमवून, त्यांना तुच्छ मानून आपण गाद्यागिर्द्यांवर लोळावे, यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ! खेडयातील गरीब बायकांच्या डोळयांतील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते.