गडयांनो! माझी आई मेली. तिने जीवन सरले तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळे जोपर्यंत सुखी नाहीत तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळत आहेत, त्याच्या तोंडातून हाय हाय उठत आहे, जोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊभाऊ सारे प्रेमाने परस्परांस मदत करतील, श्रेष्ठकनिष्ठ मानणार नाहीत, एकमेकांस वाढवतील, पाळतील पोसतील, हसवतील, ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. तोपर्यंत ती रडतच राहणार! तोपर्यंत तिच्या चिंतेची चिता धडधड पेटतच राहणार!'
रात्र बेचाळिसावी: आईचे स्मृतिश्राध्द
'गडयांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राध्द आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवावयाचा आहे.
समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून, ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला, म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत.'
'खरे पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे, असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळविणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही, आई?' मी विचारले.
'श्याम! आपले ते विठनाककडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काही तरी पूर्वी अदमण गल्ला दिला