माझ्या आईवर बायामाणसांचे प्रेम होतेच. परंतु पशुपक्ष्यांचेही होते. मोर्याक गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई जेवावयाला बसली म्हणजे मथी जेवायला येई.
मथी नेहमी आईच्या भोवती भोवती असावयाची. आई शौचास गेली, विहिरीवर गेली, तरी मथी बरोबर जावयाची. आईच्या पायांत शेपटीचे फलकारे देत नाचावयाची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. माझ्या आईचा तिला अतोनात लळा होता.
आईचे आजारपण वाढत चालले, तसतशी मथीही नीट खातपीतनाशी झाली. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात तिला घातला, तरी ती दोन शिते खाई व निघून जाई. आईने नुसता भात घातला
होता. त्याची सवाई-दिडी करून ते शेत आपण मिळविले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणांला खाली मान घालून उभे राहावे लागेल, हो!' आई खिन्न होऊन म्हणाली.
'आई ! दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते. तर त्याने ते रूप धारण केले असते का ग?' मी विचारले.
आई म्हणाली, 'श्याम! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच, की देवाला सारे