तरी तिला दूध-तूप भरपूर मिळत असे. परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे.
ज्या दिवशी आई गेली, त्या दिवशी ती सारखी म्यांव म्यांव करीत होती. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला; तिच्या खर्यात दुधातुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्नपाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली, तेथे आम्ही दहा दिवस मृतात्म्यासाठी दूधपाणी ठेवत असू; तशी पध्दत आहे. परंतु मथी त्या दुधास शिवली नाही. आई मेली त्याच खोलीत बसून राहिली. म्यांव म्यांव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिने अनशनव्रत व मौनव्रत जणू घेतले. तिसर्या् दिवशी, ज्या जगी आईने प्राण सोडले, त्याच ठिकाणी मथीने- त्या मांजरीने - प्राण सोडले! माझ्या आईची मांजरी आईपाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमय वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हांस लाज वाटली. मी मनात म्हटले, 'आई!
आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोडयांना खाजवतो, गाई चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम! देवाला सारी प्रिय आहेत. कारण सारी त्याचीच. तू माझा, म्हणून मला आवडतोस; तशी आपण सारी देवाची, म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल, ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, परंतु श्याम