भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत, एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत, यासाठी माझी आई निघून गेली असेल. ह्या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझीच आई, दत्तूची आई ती माझीच आई, गोविंदाची आई ती माझीच आई, वसंतरावांची आई ती माझीच आई, कृष्णाची आई ती माझीच आई, सुभानाची आई ती माझीच आई. सार्याव माझ्या. हो माझ्या ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वत:चा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू? हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुध्दी, ती सोशिकता, ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्प शक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमाऊप्रमाणे माझेही सोने होवो. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही होवो.'


466 of 468



मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत मी असेच म्हणणार.

(पद चाल- मेरे मौलाबुला)


माझ्या भारती या देव मुळी नुरला ।

सगळा अंधार रे भारतांतरि भरला? ॥ माझ्या ॥

नाहि दया स्नेह तिथे देव का असे

बंधुभाव तीळ न, तिथे प्रभु कसा वसे

देव मंदिरी ना

देव अंतरी ना

देव तो अजि मेला ॥ माझ्या ॥


रात्र सव्विसावी: बंधुप्रेमाची शिकवण


मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही


466 of 773