व घरची पन्नास-पाऊणशे मंडळी निघाली. बरोबर गडी-माणसे होती. बैलगाडया हर्णेबंदराला लागल्या. त्या वेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हर्णेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचे. नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे!


हर्णेबंदर जरा त्रासाचे होते. तरी तेथील देखाचा फार सुंदर आहे. हर्णेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हर्णेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकांत रूढ आहेत.


हर्णेच्या किल्ल्यावरी । तोफा मारिल्या दुहेरी । चंद्र काढिला बाहेरी । इंग्रजांनी


चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला, असे ही ओवी सांगते. हर्णेच्या समुद्रतीरावर नारळीची घनदाट वने आहेत. समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या माना सारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते. हर्णेला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत


47 of 468

तो माझ्या आईला जागे करणार होता.

"माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही; परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकली नाही की, तर त्यांना वाटे हे कुणबट माजले ! कुणब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला म्हारडा म्हणावयाचे, अशी ही पध्दत ठरलेली ! असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तान्ध झालो आहोत, हे ह्यांच्या लक्षातही येत नसते.


"वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला; तथापि, त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या


47 of 773