साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.

श्यामचीआई (Shyamachi Aai)

लेखक : सानेगुरूजी

साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!

तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'

केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या


1 of 468

जास्त, आम्हांला काही नाही. आम्ही जवळचे ना! आम्ही नेहमी घरी येतो. आम्हांला कोण विचारतो! जवळ असे ते कोपर्यासत बसे, लांबचे स्वप्नी दिसे. आहे, बोवा! दादाची मात्र चमाण आहे. मला तरी देवी आल्या असत्या, तर बरे झाले असते! मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही-दूध, मिळाले असते गाईचे तूप!'

माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते. परंतु मुकाटयाने सारे सहन करीत असे. माझ्यासारखा खटयाळ, खोडसाळ तो नव्हता.


470 of 773