साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.
श्यामचीआई (Shyamachi Aai)
लेखक : सानेगुरूजी
साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)
"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.
`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!
तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'
केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या
मग पोथ्या-पुराणे कशाला, रे वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचे-भरताचे किती प्रेम! उगीचच वाचायचे वाटते? काही त्यातला गुण घ्यावा. तुझाच ना तो भाऊ, का कोणी परका आहे? अरे, परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल, तर द्यावे. तू घरी आलास, म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत? कढत पाणी देत? तू घरी आलास, म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळीपाकाच्या वडया, नाही तर दुसरे काही तरी नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार! असे नको हो करू श्याम!'