अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच.

'संत कृपेचे हे दीप । करिती साधका निष्पाप ॥ '


अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला. खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग, ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके पाठान्तर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांस नसते. सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहीत असतात. त्यांची वचने त्यांना पाठ; परंतु ज्ञानोबा-तुकाराम यांची त्यांना आठवण नसते.


श्याम म्हणाला, 'तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो! रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी, त्या वेळेस समुद्राच्या वक्ष:स्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजिरवाण्या गोर्याअगोमटया मुलाचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेत आहे, असे वाटते!'


'समुद्राचा का चंद्र मुलगा?' एका लहान


48 of 468

तोर्यातत एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखविली जात. पूर्वजांचीही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल; जे लावाल ते फोफावेल, फळेल.


"एकदा काय झाले, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे, वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले; परंतु भाऊ म्हणाले, 'कसली अवस नि कसला शनिवार! जे व्हावयाचे ते होणार. प्रत्येक


48 of 773