साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.
श्यामचीआई (Shyamachi Aai)
लेखक : सानेगुरूजी
साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)
"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.
`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!
तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'
केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या
- हिच्यावर जास्त. असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे.
प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकांत म्हणजे सुर, नर, असुर या तिन्ही लोकांत- सात्त्वि राजस व तामस; श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांत फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर, कोठे कोपर्या त सुगंधी फुल