वल्ही मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वार्याटमुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. 'शाबास, जोरसे' असे वल्हवणारे म्हणत होते, पडावात खेचाखेच होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाजीत; परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते. त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते. तजेला देते. ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परमसुख होते.


किनार्या.वरील बैलगाडयांच्या बैलांच्या गळयातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता. तरी बोट बंदरात येऊन


50 of 468

दूध काढतात, तो घरी पोचेन.'


भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द 'जाऊ नका' सांगत होता. फळणारी पापे 'चल, राहू नको', म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले.


वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्ह्या होता. पावसाळयात त्याला उतार होत नसे. तो पर्ह्याा खोल दरीतून वहात होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघसुध्दा


50 of 773