साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.
श्यामचीआई (Shyamachi Aai)
लेखक : सानेगुरूजी
साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)
"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.
`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!
तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'
केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या
आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढयता, आपली अब्रू, सारे आपलेच.' आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वत:स विसरू शकत नाही, तो काय प्रेम करणार?
वडील म्हणाले, 'श्याम! तुझ्या आईने तुला खर्वस पाठविला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या.' त्यांनी खर्वसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, 'श्याम! अरे, बघत काय बसलास? टाक