साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.
श्यामचीआई (Shyamachi Aai)
लेखक : सानेगुरूजी
साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)
"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.
`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!
तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'
केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या
देवळात गर्दी होती. रूद्राचा गंभीर आवाज येत होता. रूद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या- त्या ऋषीच्या- डोळयांसमोर सर्व ब्रह्मांड आहे, असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्यांच्या डोळयासमोरून जात आहे, असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या सार्या गरजा त्याच्या डोळयासमोर आलेल्या आहेत. तो विश्वासी जणू एकरूप झालेला आहे, असे वाटते. माझ्या वडिलांना रूद्र येत असे. त्यांची रात्री बाळानंतर पाळी येत असे.
आई मला म्हणाली, 'जा ना रे देवळात. तू पाणी आणावयास नाही का लागत, जा.'
'मला नाही उचलणार ते हंडे. केवढाले हंडे व घागरी!' मी म्हटले,