दानी दूसरा न कोई'


मूल रडू लागले तर ती कटकट होते. 'झालं काय काटर्याला रडायला' अहो, 'असाच रोज रडतो' वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की, मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे! च्यावच्याव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार.


माझ्या आत्याला त्या वेळेस तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गडयाजवळ दिले व ती आत्याला म्हणाली, 'वन्सं, माझ्याजवळ द्या त्याला. मी त्याला घेत्ये हो.' आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला; हसू खेळू लागला.


आई त्या लग्नात स्वत:च्या मुलासही रडवी परंतु वन्संच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की, राजेच ते! आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही; उलट तिला परमधन्यता वाटे, परमसुख व समाधान


52 of 468

मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फूत्कार करीत सणकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, 'अरे, बामणाला मारले, खोताला मारले, रे, धावा !' ते मांगही जरा भ्यायले.

भाऊ त्या मांगांना म्हणाले, 'नका रे मला मारू ! मी तुमचे काय केले? सोडा मला. ही आंगठी, ही सल्लेजोडी, हे शंभर रुपये घ्या. सोडा मला!' दीनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवीत होते.

म्हातारीच्या ओरडण्याने कोणी तरी येत आहे, असे दिसले.


52 of 773